निरामय, सुखी जीवनासाठी प्रत्येकाने निरंतर योगा केला पाहिजे ! : साधना गुरव. ; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

सावंतवाडी : आरोग्यदायी, निरामय आणि सुखी जीवनासाठी प्रत्येकाने निरंतर योगा केला पाहिजे, असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ज्ञ साधना गुरव यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुष विभागाच्यावतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना साधना गुरव बोलत होत्या.
यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. धीरज सावंत, डॉ. चौगुले, डॉ. निलेश अटक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव, एन. सी. डी. विभागाच्या समुपदेशक अदिती कशेळीकर, सिस्टर आल्मेडा आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. निलेश अटक यांनी योगाचे महत्त्व आणि दैनंदिन आवश्यकता व मानसिकता याबद्दल माहिती दिली.
यावेळी साधना गुरव यांनी तसेच योगासनाचे महत्त्व पटवून देऊन उपस्थिताना सर्वसंधी संचालन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम, ओंकार, सूर्यनमस्कार आदी योगप्रकाराबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले.
एन सी डी विभागाच्या समुपदेशक अदिती कशेळीकर यांनी तंबाखू मुक्तीबद्दल प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर जाधव यांनी केले.  सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. निलेश अटक यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles