- शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत.कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत वनविभागाकडून नुकसानभरपाई स्वरूपात शासकीय मदत प्रदान करण्यात आली. पाच लाख रुपयांचा धनादेश यावेळी शिंदे यांना देण्यात आला.
यावेळी वनक्षेत्रपाल श्री. संदीप कुंभार, वनरक्षक श्री. विठ्ठल येवले, तसेच बँक संचालक श्री. प्रकाश मोरये, माजी सभापती श्री. मोहन सावंत, श्री. रूपेश कानडे, श्री. राजा धुरी, अनिल बांग, सखाराम शेडगे, मारुती गुंजाळ भास्कर गुंजाळ,मनोहर गुंजाळ, अमित डिचोलकर आणि शिवापूर ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान शिवापूर ग्रामस्थांनी आणि मित्र परिवारातून सुद्धा या विठोबा शिंदे यांना १ लाख २५ हजाराची आर्थिक मदत केली आहे. - ADVT – https://satyarthmaharashtranews.com/12015/
शिवापूर येथील गवा रेड्याच्या हल्ल्यातील जखमी विठोबा शिंदे वनविभागाकडून मदतीचा हात ! ; आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरीत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


