वेंगुर्ला : “शौर्य, सेवा आणि श्रद्धा” या त्रिसूत्रीचा आदर्श दाखविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा गौरव सोहळा मंगळवारी वेंगुर्ल्यातील भाजपा तालुका कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेमध्ये अनिकेत सदाशिव कुंडगीर याने पहिला क्रमांक पटकावला, तर विद्या सुनिलदत्त परब हिला दुसरा क्रमांक मिळाला. विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या दोघांचेही निबंध आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले. त्यांचा विशेष सन्मान भाजपा वेंगुर्ला यांच्यावतीने प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.पारितोषिक वितरण समारंभात तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना (बाळू) देसाई , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , श्रेया मयेकर , आकांशा परब , वृंदा मोर्डेकर , हसीनाबेन मकानदार , युवा मोर्चाचे हेमंत गावडे , मारुती दोडशानट्टी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून अहिल्याबाईंच्या सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय कार्याचे स्मरण करून स्पर्धकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन प्रसंन्ना देसाई यांनी केलं.
या वेळी सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण होते. भाजपा वेंगुर्ला यांनी यापुढेही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी स्पर्धकांपैकी उन्नत्ती खांडेकर , जानव्ही विकास कांबळी , वैभवी सुदेश चिपकर , साक्षी हर्षद मांजरेकर , सुरेखा बाबनी चिपकर , युवराज प्रसादराव राऊत इत्यादी उपस्थित होते .
वेंगुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निबंध स्पर्धेचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न.! ; भाजपाचे यशस्वी आयोजन..
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


