Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कोमसाप मालवणच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर! ; जिल्हा प्रतिनिधी म्हणून मालवणी कवी रुजारियो पिंटो यांची फेरनिवड.

आचरा : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ जून २०२५ रोजी डॅफोडील रिसॉर्ट आचरे येथे संपन्न झाली. यात सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. तसेच साहित्यिक उपक्रमांसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.

सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र गीताने सभेला सुरुवात करण्यात आली. या सभेसाठी तालुक्यातील विविध भागातील सुमारे ३९ कोमसाप सदस्य उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
सुरेश शामराव ठाकूर -अध्यक्ष
गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर – उपाध्यक्ष
रुजारियो पिंटो – जिल्हा प्रतिनिधी
अनिरुद्ध आचरेकर – कार्यवाह
पांडुरंग कोचरेकर – कोषाध्यक्ष
कार्यकारणी सदस्य – जेरॉन फर्नांडिस, सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, एकनाथ गायकवाड, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे.
साहित्यिक उपक्रमांच्या आयोजनासाठी पुढील प्रमाणे विविध समित्या गठीत करण्यात आल्या-
*सल्लागार समिती -* बाबाजी भिसळे, लक्ष्मण आचरेकर, रामचंद्र आंगणे, सुरेंद्र सकपाळ, माधव गावकर, सुगंधा गुरव.
*ज्येष्ठ नागरिक विभाग समिती -* अशोक कांबळी, मनाली फाटक
*युवाशक्ती कोमसाप -* भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे
*शालेय विभाग समिती-* अनघा कदम, गोविंद प्रभू
*महिला विभाग समिती-* मधुरा माणगावकर, वर्षा सांबारी
*शिक्षक उपक्रम विभाग -:* सायली परब, तेजल ताम्हणकर
*स्पर्धा व उपक्रम विभाग -* रमाकांत गोविंद शेट्ये, महादेव बागडे
सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त आणि आर्थिक जमाखर्च वाचून मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी बाबाजी भिसळे, लक्ष्मण आचरेकर, अशोक कांबळी, जेरॉन फर्नांडिस आदींनी मावळत्या कार्यकारणीचे अभिनंदन करून नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.
रुजारियो पिंटो यांनी पुढील काळात करावयाच्या नियोजनासंबंधी कोमसाप मालवणला आपले पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले, “आपण सर्वांनी दिलेल्या जबाबदारीने मधुभाईंना अभिप्रेत असे कोमसाप मालवणचे कार्य करण्यासाठी प्रयत्न करेन.”
यावेळी बोलतो मराठी या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक – विनय वझे, द्वितीय क्रमांक – मंदार सांबारी, तृतीय क्रमांक – रामचंद्र कुबल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles