संजय पिळणकर
वेंगुर्ला : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेंगुर्ला येथे सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने शनिवार दि. १४ जून २०२५ रोजी रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचे सत्कार तसेच देहदान, अवयवदान व रक्तदानाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर नियमित रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रक्तदात्यांचे सन्मानही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तरी रक्तदाते, हितचिंतक व रक्तमित्र प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जगदीश गवस यांनी केले आहे.


