🍌🍉🍌 उपवास 🍌🍉🍌
नको नको म्हटलं चहाच्या कपास
माझा आहे आज कडक उपवास.
साबुदाणा खिचडी चालेल थोडी,
डिंक लाडवाची आहेच मला गोडी.
आई विचारी काय बाळा वाढू,
उपवास आहे दे शेंगदाणा लाडू.
रिकामी पोट काहीच नाही आत
म्हणून खाल्ला थोडा वरीचा भात.
बरं नाही खाणं अस वेळोवेळी
डझनभर खाल्ली वेलची केळी.
घरची म्हणाली पुरे आता बस गप,
कुणी नाही पाहून घेतली लस्सी दोन कप.
आजचा दिवस हा असाच गेला,
उपवासामुळे अशक्तपणा आला.
फळे शहाळी खाऊन झाली,
उपवासा मुळे जरा ग्लानी आली
असे उपवास प्रकृतीस बरे,
ओ हो !!! खायचेच राहिले फणसाचे गरे !
रुजारिओ पिंटो
मालवण
9422054600


