पेडणे (गोवा) : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवाचे माजी अध्यक्ष दिवगंत सखाराम कोरगावकर यांची श्रध्दांजली सभा विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती गोवा या संघटनेच्या वतीने उद्या रविवार दि. १५ जून २०२५ रोजी दुपारी ३. ०० वाजता, भूमिपुत्र हॉटेल, सभागृह पेडणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या श्रध्दाजंली सभेला विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या श्रध्दांजली सभेत दिवगंत सखाराम कोरगावकर यांचे शोकाकुल कुटुंबियही उपस्थित राहणार आहेत. या श्रध्दांजली सभेत सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे महासचिव निखिल प्राजक्ते यानी केले आहे.


