सावंतवाडी : निरवडे व वेत्ये मार्गे सोनुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे हया रस्त्या चे काम नव्याने सुरु करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून आज ग्रामीण भागातील रस्त्ये होत आहे.मात्र योग्य नियोजन केले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

निरवडे व वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात हा रस्ता जातो माञ योग्य नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे नसल्याने या रस्त्याचे साईड पट्टी काही ठिकाणी खचली आहे .तसेच काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची तीव्र शक्यता आहे .निरवडे व वेत्ये मार्गे हा रस्ता धोकादायक बनला आहे.

वेत्ये मार्गे सोनुर्ली गावत जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रिच आहे ठिकाणी खड्डे पडल्याने मोटरसायकल यांचा अपघात होण्याची तीव्र शक्यता आहे.त्यामूळे त्या ठिकाणचे खड्डे तात्काळ भरावे अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ याच्याकडून होत आहे. वेत्ये मार्गे सोनुर्ली गावत जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रिच आहे ठिकाणी खड्डे तात्काळ न भरल्यास व हा रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सोनुर्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप गावकर यांनी दिला आहे.


