सावंतवाडी : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षा 2025 मध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग मधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमार क्षितिज कृष्णा नाईक याला सिल्वर मेडल प्राप्त झाले. या परीक्षेत यश मिळवणारा तो दोडामार्ग तालुक्यातील एकमेव विद्यार्थी आहे. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये पार पडते, गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा टप्प्यातून ही परीक्षा पार पाडली जाते. यातील गुणवान विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संस्था अध्यक्ष श्री विकास भाई सावंत, उपाध्यक्ष डाॅ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, सचिव व्ही. बी. नाईक, मुख्याध्यापक श् प्रल्हाद महादेव सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. त्याला गणित शिक्षक श्री. बामणीकर सर व त्याचे पालक श्री. कृष्णा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या क्षितिज नाईक याला गणित प्रज्ञा परीक्षेत सिल्वर मेडल !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


