वेंगुर्ला : आज दिनांक 16 जून 2025 रोजी शाळा मठ कणकेवाडी मध्ये शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सवाने उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम शालेय परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली त्यानंतर नवागतांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

तसेच दुपारी गोड शिऱ्यासह भोजन देण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्रीम. जयश्री सकपाळ मॅडम , ईशा गावडे , सानिका सावंत , निशा राणे , पूजा सावंत , नामदेव सावंत,संतोष दाभोलकर,अंगणवाडी सेविका ज्योती परब मॅडम,मदतनीस गावडे मॅडम आदी पालक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापकश्री. वीरधवल परब सर, सहकारी शिक्षक श्री.रामा पोळजी सर, श्री. प्रकाश भोई सर,श्रीम.राजश्री घोरपडे मॅडम उपस्थित होते.


