Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बदललेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन ! ; सावंतवाडी, कणकवली व तळेरे येथे मोफत सत्रे.

सावंतवाडी : चालू शैक्षणिक वर्षी पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप बदललेले असून त्याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने सावंतवाडी, कणकवली व तळेरे या ठिकाणी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बदललेल्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसोबतच विविध शाखांची ओळख, शिष्यवृत्ती योजना तसेच करिअर संधी यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे.

मार्गदर्शन सत्रांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : तळेरे सत्र – शनिवार, दि.२१ जून रोजी स.१० वा., विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय, तळेरे (वैभववाडी, खारेपाटण, देवगड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी), कणकवली सत्र – शनिवार, दि.२१ जून रोजी दु.३ वा., एचपीसीएल सभागृह, कणकवली कॉलेज (कणकवली, मालवण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी), सावंतवाडी सत्र- सोमवार, दि.२३ जून रोजी स.११ वा. भोसले नॉलेज सिटी सेमिनार हॉल (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व कुडाळ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी).

ही मार्गदर्शन सत्रे पूर्णपणे मोफत असून, विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम व करिअर संधी याची स्पष्ट समज आवश्यक आहे. हे सत्र त्याच उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.” अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९६०४२७२५६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles