सावंतवाडीत कोल्ड्रिंक्स मालकाची आत्महत्या.? ; शहरात खळबळ.

सावंतवाडी : सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद पडते यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरातून बाहेर रक्त येताना दिसल्याने येथील नागरिकांना संशय आला. पोलिसांच्या समक्ष आज त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला. यावेळी गळफास लावत त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेतल्याचा संशय आहे‌.

मयत श्री. पडते यांनी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. दोन दिवस त्यांचे घर बंद होते. घराच्या दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येताना शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. दरम्यान पोलिसांच्या उपस्थित येथिल रहिवासी राजू भाट, आबा पडते यांनी या घराचा दरवाजा तोडला‌. यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. जवळपास दोन-तीन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज आहे‌. नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मयत पडते यांचे सावंतवाडी बाजारपेठेत प्रसाद कोल्ड्रिंक्स नावाचे दुकान आहे. गेली अनेक वर्ष ते कोल्ड्रींक्सचा व्यवसाय करत आहेत. दोन-चार दिवस त्यांची जामगाव नसल्यानं त्यांच्या घराजवळ पाहिले असता दरवाजा बंद दिसून आला. तर दरवाजा शेजारून रक्त येताना दिसले. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संशय आला. त्यांनी याची पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सहाय्याने दरवाजा उघडला असता त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. दोन ते तीन दिवस झाले असल्यामुळे त्यांच्या मृतदेहातून रक्त दरवाजाबाहेर आले होते. मयत पडते हे एकटेच या घरात राहत होते‌. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडीलांचे निधन झाले होते. पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात नेण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, निलेश नाईक, सचिन चव्हाण आदींनी घटनास्थळी पुढील सोपस्कार पार पाडले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles