संजय पिळणकर
सावंतवाडी : तुळस गावचे सुपुत्र, सर्पमित्र महेश राऊळ यांनी तुळस येथील २९ व्या रक्तदान शिबिराच्या वेळी देहदानाचा संकल्प केला. शासकीय जिल्हा रुग्णायाचा फॉर्म भरून त्यांनी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,पत्रकार संघ वेंगुर्ला व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्याकडे सुपूर्द केला.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संघटना रक्तदान,अवयवदान व देहदान हे महान कार्य अविरतपणे करत असून त्यासाठी समाजात सतत जनजागृती करत असते. तसेच जिल्ह्यात त्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करत असते.यातूनच प्रेरणा घेऊन महेश राऊळ यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने तसा फॉर्म भरून आज आपला निर्णय तुळस येथील आयोजीत कार्यक्रमात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे सस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, माजी सभापती मा.जयप्रकाश चमणकर,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सावंत,मेहेंद्र मातोंडकर,दाजी नाईक, योगेश तांडेल,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे दोडामार्ग सावंतवाडी विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष आबा चिपकर,उपाध्यक्ष राजेश पेडणेकर,उपाध्यक्ष सौ.समृद्धी पिळणकर,सचिव भूषण मांजरेकर, सहसचिव श्रीकृष्ण कोंडुस्कर, नागवेकर सर,जयवंत तुळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर केला.
यावेळी वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती मा.जयप्रकाश चमणकर यांनीही सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याने प्रेरित होऊन नेत्रदानाचा निर्णय जाहीर करून तसा फॉर्म भरून संस्थेकडे सुपूर्द केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सचिन परुळकर यांनी केले.
महेश राऊळ यांनी देहदानाचा संकल्प करीत घातला आदर्श ! ; सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेचा पुढाकार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


