‘एक मदत गरजू विद्यार्थ्यासाठी’ उपक्रमांतर्गत दत्तक!
सिंधुदुर्ग : दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत दर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आलेले आहे.
दरवर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळामार्फत जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेत ‘एक मदत गरजू विद्यार्थ्यांसाठी’ उपक्रमांतर्गत त्यांना शैक्षणिक वर्षात लागणारे शैक्षणिक साहित्य देण्यात येते. यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, चित्रकला वही, क्रेयॉन्स, कंपासपेटी ईत्यादी साहित्य देण्यात आले.
प्रति वर्षीप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना साहित्य देतानाचे छायाचित्र काढणे योग्य वाटतं नसल्याने सदर वाटपाची छायाचित्रे काढण्यात आलेली नाहीत. दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्रमंडळ मार्फत सदर उपक्रमास मदत केलेल्या दात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


