वेंगुर्ला : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात १० कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माॅ के नाम’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करावे, असे निर्देश दिले आहेत. दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ ‘वन महोत्सवाचा’ काळ म्हणून साजरा केला जातो. या काळात वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सदर उपक्रमामध्ये भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ही मंडलात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करणार असून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्या मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

दिनांक २०.०६.२०२६ रोजी भाजप किसान मोर्चा च्या वतीने सामाजिक वनीकरण विभाग कार्यालय सिंधुदुर्ग येथे राजेंद्र मगदूम – DFO व संदीप कुंभार – RFO कुडाळ यांची भेट घेण्यात आली.
राज्य शासनाने यावर्षी १ कोटी वृक्ष लागवड राज्यामध्ये करण्याचे निश्चित केले आहे. यापैकी ३ लाख वृक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
हे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता ते प्रत्यक्षात होणे आवश्यक आहे.तसेच यासाठी वृक्ष वितरण करतेवेळी होणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.या अडचणी संदर्भात त्वरितच मा.जिल्हाधिकारी यांची हि भेट घेण्यात आली व वृक्ष वितरणाबाबतच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या.
तसेच मा.पालकमंत्री श्री.नितेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत लवकरच देवगड येथे शेतकरी मेळावा घेऊन वृक्ष वाटप कार्यक्रम करण्याचे ठरले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत,गुरुनाथ पाटील – सरचिटणीस , सौ. ज्योती देसाई, महेश संसारे, यशवंत पंडित, महादेव सावंत, दामोदर नारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .


