वेंगुर्ला : महाराष्ट्र रायफल असोसिएशन च्या वतीने (MRA) वरळी मुंबई येथे दि. ५ जून ते ९जून दरम्यान पार पडलेल्या 25 व्या कॅप्टन एस. जे. इझेकियन स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपूत्र भी दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर व कु. गौरव दत्तप्रसाद आजगांवकर यांनी सुयश प्राप्त केले. हे पिता-पुत्र प्री नॅशनल स्पर्धेसाठी पात्त ठरले आहेत. त्याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला .
मुबंई वरळी येथे झालेल्या स्वर्धन मुंबई, ठाणे पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, धुळे नाशिक नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्री. दत्तप्रसाद आजगांवकर यांनी 50 मी. 0.22 पीप साईड रायफल प्रोन प्रकारात 600 पैकी 538 मिळविले व राज्यात 8 वी रॅक प्राप्त केली. तर कु. गौख आजगांवकर याने 10 मी. पीप साईट एअर रायफल वा प्रकारात 400 पैकी 381 गुणांसह राज्यात 10 वी रॅक प्राप्त केली त्यांची प्री. नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्याबरोबर वेंगुर्ले तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट देत मा.नगराध्यक्ष राजन गिरप व मच्छिमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महीला मोर्चा अध्यक्षा सुजाता पडवळ , श्रेया मयेकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , वृंदा गवंडळकर , शितल आंगचेकर , वृंदा मोर्डेकर , हसीनाबेन मकानदार , सुरेंद्र चव्हाण , श्रीकांत रानडे , प्रमोद वेर्णेकर , राघवेंद्र जोशी , हेमंत परुळेकर , राहुल मडकईकर , सत्यवान भोवर ,बाळा साटेलकर , शेखर परब , मनोज पांगम तसेच परुळेकर गल्लीतील नागरिक उपस्थित होते .
आजगांवकर कुटुंबीयांच्या या दुहेरी यशाबद्दल त्यांचे वेंगुर्ले तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.”


