Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

निरामय जीवनासाठी योगाची कास धरा ! : सीताराम गावडे. ; ऑर्बिट योगा स्टुडिओचा व्दितीय वर्धापन व जागतिक योगा दिन उत्साहात साजरा !

सावंतवाडी : आपणास निरामय जीवन जगायचे असेल तर योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे. ऑर्बिट योगाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात योगाभ्यास करणाऱ्यांनी अनेक आजारांवर मात केली आहे, त्यामुळे सर्वानीच योगाकडे वळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांनी ऑर्बिट योगा स्टुडिओच्या व्दितीय वर्धापनदिनाच्या व जागतिक योगा दिनाच्या उध्दघाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे,डॉ. शिरीष चौगुले, डॉ. अमृता स्वार, डॉ. गणपत्ये, सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे, पतंजलीचे महेश भाट, वेध शाळेचे प्राध्यापक कशाळीकर, संदीप कुडतरकर, ऑर्बिट योगा स्टुडिओचे संचालक अमोल सोनवणे, विनेष तावडे आदी उपस्थित होते.

यावेळी सिताराम गावडे पुढे म्हणाले, योगाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, देवाधिदेव शंकर यांनी अफाट शक्ती ही योग व ध्यानधारणेमुळे प्राप्त केली. त्यांचे तांडव नृत्य हे योग साधनेचा एक भाग आहे. शरीरातील सर्व अवयव सुदृढपणे कार्यान्वित राहायचे असतील तर गोळ्यांपेक्षा योगा त्यावर प्रभावी औषध आहे. योगाची कास धरल्यावर निरोगी जीवनशैली आपल्याला जगता येईल, त्यासाठी तंत्रशुद्ध योगाची गरज आहे. तो योगा ह्या ऑर्बिट योगा स्टुडिओमध्ये शिकवला जातो. त्याचा प्रत्येकाने लाभ घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी योगा शिकण्यासाठी येणाऱ्या योगा प्रशिक्षणार्थ्यांनी नऊ ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या योगा कला सादर केल्या. त्यातून तीन ग्रुपना नंबर देण्यात आले तर दोन ग्रुपला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व इतर ग्रुपला सन्मानपत्र, मेडल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर आभार प्रशिक्षक अमोल सोनवणे यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles