सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील निरवडे (ग्रामपंचायत निरवडे, प्रभाग तळवडे) येथे परिसग्राम संघ आणि नवसंजीवनी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत PRI-CBO कन्वर्जन प्रोजेक्ट अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी निरवडे गावच्या सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच श्री. पेडणेकरयांची प्रमुख उपस्थिती होती. केरळहून आलेल्या कुटुंबश्री मेंटर गिरीजा मॅडम आणि BRP प्राची राऊळ मॅडम पतंजली योगपीठ, क्लबच्या वतीने संघटन मंत्री महिला पतंजली दीपश्री खाडीकर मॅडम, हरिद्वारचे योगशिक्षक विद्याधर पाटणकर सर, तसेच प्रमोद नाईक, निशा कडावलकर, श्रेया बांदेकर आणि शिल्पा पडते या योगशिक्षकांनी उपस्थितांना योगाचे उत्तम मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिकेही सादर केली. “योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात सर्व समूहातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. LRP चैताली गावडे परी ग्रामसंघ पदाधिकारी, नवसंजीवनी पदाधिकारी, CRP लिपिका प्रेरणा जाधव, वैष्णवी गावडे, रसिका पारकर, वैष्णवी गावडे, आरोही बांदिवडेकर, राधिका जाधव, समीक्षा जाधव, अंकिता बागकर, प्रेरणा गावडे आदि उपस्थित होते.
या योग दिनानिमित्त निरवडे गावासाठी एक आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली. हरिद्वारचे योगशिक्षक विद्याधर पाटणकर सर हे निरवडे येथे नियमित सार्वजनिक योगा कार्यक्रमाचे नियोजन LRP चैताली गावडे यांनी केले.


