Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुलांबाबत पालकांची संवेदनशील दक्ष भूमिका कस लावणारी ! : मानसी परब. ; परब मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

कुडाळ : आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता, अभ्यास आवड, आपण त्याच्या प्रगतीसाठी देतं असलेलं रचनात्मक बळ, वेळोवेळी शिक्षक आणि मार्गदर्शकाकडून आलेल्या सूचना, आपलं मुलांसोबत असलेली अभ्यास प्रगती संदर्भातली वागणूक, आपण केलेलं फाजील लाड, आपल्या आशा आणि अपेक्षा ह्या सर्वं बाबतीतली आपली संवेदनशील दक्ष भूमिकेचं कस लावणारी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब यांनी केले.

कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे परब मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा – 2025 प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक आर. एल. परब, प्रमुख अतिथी ऋषिकेश परब, संदीप परब, सौ. मानसी परब यांसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

दरम्यान सौ. मानसी परब पुढे म्हणाल्या, कोणत्याही चुकीबद्दल मुलांना शारीरिक शिक्षा किंवा अपशब्द करू नये, जेणेकरून त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल अशी कोणतीही कृती करू नका. आपल्या मुलांना शिस्त लावताना खंबीरता, ममता, मनमोकळेपणा आणि वाजवीपणा ह्या चार गोष्टींचा विचार करूनचं त्यांना सौंम्य शिक्षा करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी परब मराठा समाज, सिंधुदुर्ग यांच्यावतीने विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.  प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन आर. एल. परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपतींना मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles