लीड्स : टीम इंडियाने लीड्समधील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार सुरुवात केली. भारताच्या 3 फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध शतक केलं. टीम इंडियाच्या या त्रिकुटाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 471 रन्स केल्या. इंग्लंड-इंडिया पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी 20 जून रोजी यशस्वी जैस्वाल याने शतक केलं.

यशस्वीचं हे इंग्लंडमधील पदार्पणातील पहिलं कसोटी शतक ठरलं. तर त्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात शुबमन गिल याने शतक झळकावलं.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपकर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात ऋषभ पंत याने सिक्ससह शतक पूर्ण केलं. अशाप्रकारे टीम इंडियाच्या 3 फलंदाजांनी यासह पहिल्या डावात शतक केलं. टीम इंडियाच्या नावावर 3 शतकांनंतर कसोटी सर्वात निच्चांकी धावसंख्येचा नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर झाला.
भारत कसोटी क्रिकेट इतिहासात एका डावात 3 शतकं केल्यानंतरही सर्वात निच्चांकी धावसंख्या करणारा पहिला संघ ठरला. याआधी हा नकोसा विश्व विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध 2016 साली 475 रन्स केल्या होत्या.

(Photos : PTI)
दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडकडून उपकर्णधार ओली पोप याने शतक केलं. पोपच्या कसोटी कारकीर्दीतील हे नववं शतक ठरलं.


