वेंगुर्ला : येथील नगर वाचनालय, वेंगुर्लाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरयू असोलकर उपस्थित होत्या.
त्यांच्या हस्ते न्यू एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा या प्रशालेतील इयत्ता दहावीत उज्ज्वल यश मिळणारी कु. राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर हिने इंग्रजी विषयात तालुक्यात बाजी मारत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला, तर याच प्रशालेच्या कु. स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हिने हिंदी या विषयात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थीना म्हणून नगर वाचनालय, वेंगुर्ले यांच्या वतीने गौरविण्यात आले आणि रोख पारितोषिक देण्यात आले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन सौ. वर्षा मोहिते मॅडम केले तर हिंदी विषयासाठी प्रा. वैभव खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
हे यश संपादन करणाऱ्या राजलक्ष्मी वराडकर आणि स्नेहा वेंगुर्लेकर यांचे तसेच मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांचे, संस्था चेअरमन वीरेंद्र कामत आडारकर, व्हाईस चेअरमन रमेश पिंगुळकर, सचिव रमेश नरसुले, खजिनदार सुजित चमनकर, संस्था सभासद राधाकृष्ण मांजरेकर, गोविंद मांजरेकर, सुनील परब इतर सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजाराम कोचरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाबी नवार
तसेच इतर सर्व संस्था सदस्य, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ. मोहिते मॅडम आणि खानोलकर सर, इतर सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक यांनी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थी आणि शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले.
नगर वाचनालय वेंगुर्लातर्फे न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाच्या राजलक्ष्मी वराडकर, स्नेहा वेंगुर्लेकर यांचा गौरव ! ; दहावीच्या परीक्षेत राजलक्ष्मी इंग्रजीत तर स्नेहा हिंदी विषयात तालुक्यात प्रथम.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


