- वारकऱ्यांनी पोलीस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आवाहन.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारने जाहीर केला आहे. या टोल फ्री साठी आपापल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात गाडी च्या नंबर सह अर्ज करून पोलीस स्टेशनकडून पास विठ्ठल भक्तांनी घेणे आवश्यक आहे. अशा वारकऱ्यांना, किंवा विठ्ठल भक्तांना पंढरपूरला जाणाऱ्या मार्गावरील प्रत्येक टोलवर फ्री प्रवास होणार आहे.तरी या योजनेचा सर्वांनीच लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष राऊळ यांनी केले आहे.
आषाढवारी साठी शासनाने हा उपक्रम विठ्ठल भक्तांसाठी सुरू केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढ वारीला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाशी संपर्क साधावा असेही त्यांनी म्हटले आहे.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी टोल फ्री प्रवास ! ; शासनाचा ‘लई भारी’ उपक्रम.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


