वैभववाडी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वेंगुर्ला तालुका शाखेची पुनर्बांधणी करण्यासाठी रविवार दिनांक २९ जून रोजी वेंगुर्ला येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची सभा आयोजित केली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार जिल्हा व तालुका शाखा स्थापन करणे, काही ठिकाणच्या शाखांची पुनर्बाधणी करण्याचे कार्य सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ तालुका शाखेची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील जुन्या- नव्या कार्यकर्त्यांची एक सभा रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ठिक १०.०० वा. प्रा.डॉ. आनंद बांदेकर सर, रामघाट रोड, वेंगुर्ला यांच्या घरी आयोजित केली आहे. यावेळी जिल्हा शाखा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील नव्या- जुन्या कार्यकर्त्यांसह या ग्राहक चळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रतिनिधीनी रहावे. उपस्थित सर्वांशी विचारविनिमय करून सर्वानुमते तालुका शाखेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या जिल्हा शाखेने दिली आहे.
ADVT –


