Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी मानले आ. दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार.!

आंबोळी : गेली कित्येक वर्षे सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात शोध व बचाव चे काम करून अपघातग्रस्त व प्रशासनाला सहकार्य करणारे सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्कु ग्रुप आंबोली सांगेलीच्या मेंबरसाठी चांदा ते बांदा योजना, जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग, व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचेमार्फत, आपत्कालीन बचाव साहित्याचे वितरण आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग बॅंक अध्यक्ष मनीष दळवी,  NDRF कमांडर आर. जे. यादव, निवासी जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर साहित्य मुळे सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्कु ग्रुप आंबोली सांगेली चे मेंबर शोध व बचाव कार्य करताना स्वतःची योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रशासनाला व अपघातग्रासताना सहकार्य करणार आहेत.

सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेलीचे आंबोली घाट परिसरात जेव्हा जेव्हा अपघात होतात तेव्हा तेव्हा नेमहीच फार मोठे योगदान असते. ह्या टीम चे मेंबर कोणतीही शासकीय मोबदला न घेता निःस्वार्थ व अविरत पणे जनसेवेचे हे काम करत आहे.
या टीम व प्रशासनाला ला हे शोध व बचाव चे साहित्य येणाऱ्या काळात खूप सहकार्य करणारे असणार आहे, एखाद्या शोध व बचाव टीमला एवढ्या मोठया प्रमाणात शोध व बचाव साहित्य उपलब्ध करून देण्याची कदाचित ही पहिलीच घटना असणार म्हणून त्यांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेले माननीय नामदार आमदार श्री दीपक भाई केसरकर व पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांचे व महायुती सरकार चे खूप खूप आभार मानत असल्याचे आंबोळी सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी कळविले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles