सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली येथील बुद्ध – फुले – शाहू – आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या भावना अनंत कदम यांच्या घरावर माडांचे झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान घराचे छप्पर जोरदार कोसळले यात सौ. कदम ह्या बालंबाल बचावल्या आहेत. मात्र घराचे फार मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती त्यांनी ‘सत्यार्थ’ न्यूजशी संवाद साधताना केली आहे.


