लंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर ही लंडनमध्ये आहे. सारा सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सारा काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात होती. साराने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेस हेडनसोबत धमाल मस्ती केली.

(Photo-Screenshot/Instagram)
सारा तेंडुलकरने इंस्टावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. साराने इंस्टा स्टोरीत पार्टी करत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. सारा तिच्या आजोबा (साराच्या आईचे वडील) आनंद मेहता यांच्या घरी आहे. साराची आजी अॅनाबेल मेहता या इंग्लंडमध्ये जन्मलेल्याआजी आणि नातीचं नातं कसं असतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. तसंच नात हे एनाबेल आणि सारा यांच्यातही आहे. साराने आतापर्यंत तिच्या आजीसह खूप वेळ घालवला आहे. साराने आतापर्यंत अनेकदा तिच्या आजीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
साराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन क्वीसलँडमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. साराने समुद्रकिनारी बाईक रायडींग केली. साराचे हे फोटो नेहमीप्रमाणे व्हायरल झाले.
तसेच साराने ब्रिस्बेनमध्ये गुलाबी ड्रेसमध्ये सॉफ्ट ड्रिंकचा आस्वाद घेतला. साराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ग्रेस हेडन हीच्यासह अनेक ठिकाणी भेट दिली आणि आनंद लुटला.


