सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए गुणांसह प्रथम, दिव्या जनार्दन जंगले हिने ८.९१ गुणांसह द्वितीय तर सेजल दत्तात्रय देसाई हिने ८.६४ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.विजय जगताप, परीक्षा विभाग प्रमुख प्रा.नमिता नार्वेकर, प्रा.प्रणाली जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अभिनंदनीय !- यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी. फार्मसी निकाल १०० टक्के ! ; भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय तर सेजल देसाई तृतीय.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


