Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड ! ; नूतन कार्यकारिणी जाहीर.

वेंगुर्ला : ग्राहकांचे हक्क,न्याय्य व्यवहार, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासाठी झटणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या अग्रगण्य संस्थेची वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी नव्याने जाहीर करण्यात आली.रामघाट-वेंगुर्ला येथे आयोजित बैठकीत प्रा.डॉ.आनंद प्रभाकर बांदेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील होते. त्यांनी ग्राहक पंचायतच्या कार्यप्रणालीवर मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्राहक हा समाजाचा आधारस्तंभ असून, त्याला योग्य माहिती, सेवा आणि हक्क मिळाले पाहिजेत.ही संस्था या दिशेने कार्यरत आहे.”
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुडतरकर यांनी संस्थेच्या गेल्या काही वर्षांत झालेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.जिल्हा संघटक विष्णुप्रसाद दळवी,जिल्हा सहसचिव सुगंधा देवरुखकर, महिला जिल्हा संघटक सौ.रीमा राजन भोसले,तसेच जिल्हा सल्लागार अ‍ॅड.समीर वंजारी यांनी ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.
यावेळी एकमताने वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली.

अध्यक्ष: प्रा. डॉ. आनंद प्रभाकर बांदेकर (माजी प्राचार्य- बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला)
उपाध्यक्ष: प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर
सचिव: सुनील नवसू रेडकर
तालुका संघटक: महेश श्रीधर राऊळ
सहसंघटक: महेंद्र सुरेश घाडी
महिला सहसंघटक: सौ.मंजुषा महेंद्र आरोलकर
सहसचिव: हेमंत दत्ताराम गावडे
कोषाध्यक्ष: प्रा.डॉ.गोविंद प्रकाश धुरी
प्रसिद्धी प्रमुख: संजय सखाराम पिळणकर
सल्लागार: डॉ.संजीव लिंगवत
सदस्य: प्रा.वैभव खानोलकर,सौ. अंकिता आनंद बांदेकर,विवेक तिरोडकर,मोहन मोबारकर,सुनील आळवे,नामदेव सरमळकर,विकास वैद्य.
नवीन कार्यकारिणीबद्दल जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.अध्यक्षपदी निवड झालेले प्रा.डॉ.आनंद बांदेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ग्राहकांच्या हक्कांसाठी संस्था भक्कम उभी राहील.ग्रामीण भागात ग्राहक जागृतीसाठी शिबिरे, कार्यशाळा आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जातील.”
ग्राहक पंचायत महाराष्ट्र वेंगुर्ला कार्यकारिणीची ही नवसंघटना निश्चितच तालुक्यातील ग्राहकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडेल आणि त्यांचे समाधान सुनिश्चित करण्यासाठी सजगतेने कार्य करील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles