सावंतवाडी : हे बा पांडुरंगा !, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला सुख, समृद्धी व निरामय आयुष्य प्रदान कर!, तसेच बळीराजाला योग्य असे पीक मिळू दे आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे आयुष्य उजळून निघू दे, हे विठ्ठला, प्रत्येकाची आर्थिक भरभराटी करा!, असे साकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विठ्ठल चरणी घातले आहे.

सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व त्यांच्या सौभाग्यवती संजना परब यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तथा भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


