काळा…सर्वात निराळा !
लाल पिवळा हिरवा भगवा
रंगांची सगळ्या वाटणी झाली
एकच होता उरला तो काळा
शेवटी त्याच्याशीच गट्टी झाली
‘काळतोंड्या’ अपमानाचे शब्द
पचवायची सवय ती झाली
पण काळ्याचे महत्त्व काय ते
सांगण्याची योग्य वेळ आली
काळ्याचा तिरस्कार करु नका
कोळशाच्या पोटी हिरे जन्मती
अलभ्य असे ‘ब्लॅक डायमंड’
अमूल्य त्यासी जगी समजती
काळ्याची अपकीर्ती करू नका
अक्षरांसाठी काळाचं असतो
जीवन उजळतो सर्वांचे जो
‘ब्लॅक बोर्ड’ अनमोल असतो
पाणउतारा ‘त्याचा’ करू नका
कुणाच्याच गटात ‘तो’ नसतो
निःपक्षतेचे प्रतीक म्हणून
‘ब्लॅक कोट’ कोर्टात ‘तो’ शोभतो
काळ्याचा उपहास करू नका
दिनांचा नाथ तोही काळा आहे
पंढरी जाऊनी पाहावा आज
‘काळ्या’चा केवढा सोहळा आहे
✍🏻 कमलेश गोसावी
काळसे, मालवण
मो. 9421237887


