Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

न्हावेली येथील युवकांच्या कार्यतत्परतेला सलाम! ; भर पावसात रस्त्यावर कोलमडलेले झाड केले बाजूला.

सावंतवाडी : सावंतवाडी – रेडी मार्गावरीलवरील न्हावेली गावातून जाणार्‍या आज संध्याकाळच्या सुमारास झाड पडून रस्त्यावर आडवं झाले होते. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. या रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते.
हे न्हावेली चौकेकरवाडीतील तरुण विठ्ठल परब यांने पाहिले असता गावातील उपसरपंच तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांच्या कानावर घातली. त्यानंतर लगेच घटनास्थळी दाखल होतं पाहणी केली. त्यानंतर भरपावसात तेथील तरुण वर्ग विठ्ठल परब यांने स्वतःच कटर मशीन उपलब्ध करून दिली. उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी दीपक पार्सेकर यांना तातडीने बोलावून घेऊन कटर मशीनच्या सहाय्याने तेथील युवक अनिकेत धवण, राज धवण, दीपक पार्सेकर, पिंटो धाऊस्करयांच्या साहाय्याने ते झाडं तोडून मोकळ केलं. यावेळी त्याठिकाणी सरपंच अष्टविनायक धाऊस्कर, ग्रामस्थ सुनील धाऊस्कर, संदीप धवण आदि उपस्थित होते. भरपावसात यवकांनी केलेल्या ह्या विधायक कामाचे वाहनधारकांनी आभार मानले.

दरम्यान सदर रोडला धोकादायक झाडे आहेत व ती हटावावी, अशी मागणी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी प्रशासनाकडे केली होती. तेव्हा त्याची पाहणी करून ती झाडं तोडून देतो, असे आश्वासन वैभव सगरे यांनी दिले होते. मात्र अद्यापही ते काम नाही झालं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles