सावंतवाडी : येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता नरेंद्र डोंगर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या संकल्पनेमधून, बदललेले वातावरण व पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांवर उपाय म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावंतवाडी नगरपरिषद, वनविभाग सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी लायन्स क्लब सावंतवाडी, इनरव्हील क्लब सावंतवाडी या संस्था सहभागी होणार आहेत, तरी या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थान प्रेमी, राजमाता प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


