सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण ह्या विवाहीताने नुकतीच आत्महत्या केली. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मयत प्रिया चव्हाण कुटुंबीयांचे घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले. यावेळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रेया परब, सावंतवाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, उपशहर संघटक समीरा शेख, तसेच पदाधिकारी रश्मी माळावदे, कल्पना शिंदे, प्राजक्ता बांदेकर व इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी चव्हाण कुटुंबियांना धीर देत महिला आघाडी प्रमुख श्रेया परब यांनी सांगितले की घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक असून यातून चव्हाण कुटुंबाने स्वतःला सावरावे, असे सांगत त्यांचे सांत्वन केले.
मयत प्रिया चव्हाण कुटुंबीयांचे उबाठा सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


