साईभक्त माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या होणार साईपालखीचे आगमन !

सावंतवाडी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या बुधवार दिनांक १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता श्री साई बाबांच्या पालखीचे आगमन होणार आहे. यावेळी साईभक्त आमदार केसरकर यांच्या हस्ते साई बाबांची विधीवत पूजा-अर्चा केली जाईल. या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबरोबरच गुरुवार ११ जुलैला गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा होत असल्याने सकाळी पालखीचे प्रस्थान श्री साईबाबा मंदिर, माडखोल येथे होईल. माडखोल येथील मंदिरातही विधीवत पूजापाठ, दर्शन सोहळाणणआयोजन करण्यात आले आहे. सर्व साई भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles