सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता, व अवलंबिताना यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी, महसुल, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती विषयी कोणत्याही समस्या असल्यास त्या विषयाचे अर्ज दिनांक 15 जुलै 2025 पूर्वी लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावेत.
जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी,वीरनारी, वीरपिता, वीरमाता यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी, महसुल, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती विषयी समस्या निवारणासाठी सदर सैनिक दरबाराकरीता उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02362 228820,8219285788 वर सपंर्क करावा.
—–
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/18360/


