नवी दिल्ली : स्टीफन हॉकिंग हे महान वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्यांनी अंतराळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. त्यांनी 2017 साली Tencent WE परिषदेत पृथ्वीविषयी मोठं विधान केलं होतं. आपल्या पृथ्वीचं भवितव्य अंधकारमय आहे, असं ते म्हणाले होते.

(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
स्टीफन हॉकिंग यांनी 2060 सालापर्यंत पृथ्वी मानवाला राहण्यायोग्य नसेल, असं भाकित वर्तवलं होतं. लोकसंख्यावाढ आणि हवामान बदल या दोन कारणांमुळे पृथ्वी राहण्यायोग्य नसेल, असे ते म्हणाले होते. पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवामानात झपाट्याने होणारा बदल हा पृथ्वीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू शकतो, असे बोलले जाते.
स्टीफन हॉकिंग यांच्या या भाकितामुळेच आता पृथ्वीचं काय होणार, असा प्रश्न विचारला जातो. वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्व नाहीसे होईल, असे म्हटले जाते.

(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)


