सावंतवाडी : उद्या शुक्रवार दिनांक ११/०७/२०२५ सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची उबाठा शिवसेना शिष्ट मंडळ मयत प्रिया चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत भेट घेणार आहेत.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. श्रेया परब, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सावंतवाडी येथे आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाणे भेट घेऊन जाब विचारणार आहेत.


