कणकवली : “कणकवली शहरातील एक ज्येष्ठ उमदे व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रातील तळमळीचे कार्यकर्ते, विविधांगी व्यक्तिमत्व आणि एक सुयोग्य मार्गदर्शक दादा कुडतरकरजी यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशा शब्दात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सामाजिक कार्यकर्ते सीताराम कुडतरकर यांच्या निधनाबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.



