सावंतवाडी : तत्कालिन पालकमंत्री व विद्यमान भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोलार हायमास्टसाठी भरघोस निधी देण्यात आलेला होता.

त्यापैकी नेमळे येथील दोन हायमास्टचे आज भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, नेमळे ग्रामपंचायत सदस्य गौरव मुळीक, गेळे सरपंच सागर ढोकरे तसेच नेमळे गावातील नागरिक उपस्थित होते.

गावामध्ये या प्रकाशयोजनेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत असून रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. भाजपाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अशा प्रकारच्या विकासकामांना चालना मिळत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.


