वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष व करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक युवा कौशल्य दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या करिअर संसदेच्या विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली आणि त्यांना प्रमाणपत्र व डायरी देण्यात आली. तसेच करिअर कट्टा विभाग प्रमुख डॉ. ए. आर. दिघे यांनी ‘स्पर्धा परीक्षा व करिअर’ आणि प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी ‘कौशल्य विकासाचे महत्त्व’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.एस.बेटकर आणि आभार प्रदर्शन उद्योजकता विकास विभाग प्रमुख, डॉ. एस. सी. राडे यांनी केले.



