सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे आज सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विकासभाई सावंत यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवार, १६ जुलै रोजी सकाळी १२ वाजता माजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, उद्या सकाळी ९ ते १० या वेळेत त्यांचे पार्थिव आर.पी.डी. हायस्कूल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली आहे .
स्व. विकासभाई यांचं पार्थिव माजगाव येथील निवासस्थानी आणून अंत्यसंस्कार केले जातील.
एक अभ्यासू आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व विकासभाई सावंत यांनी सार्वजनिक जीवनात विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना ‘सत्यार्थ ‘ न्यूज परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली..


