Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चराठा वजरवाडी रस्त्यावरील नवीन पुलाची बांधणी करणाऱ्या ठेकेदाराची ‘PWD’ ने वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी ! : अमित वेंगुर्लेकर.

सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा गोठण वजरवाडी रस्त्यावरील काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेल्या ओहाळाच्या पाण्यामुळे रहदारीस होणाऱ्या मोठ्या अडथळ्यास आळा घालण्यासाठी संबंधित शासकीय प्रशासनाने टेंडरद्वारे आरसीसी पुलाची बांधणी करण्यासाठी ज्या व्यक्तीस ठेकेदारी दिलेली होती. त्या कामाची कार्यपद्धती जनसामान्याच्या हिताची आहे का किंवा रहदारीच्या योग्य कामाची कार्यपद्धती संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लिखित निवेदिकेच्या नियमात राहून त्याप्रमाणे संबंधित पुलाचे बांधकाम जनसामान्याच्या रहदारीच्या योग्य झाले आहे?, याबाबतचा कायदेशीर मंजुरी अहवाल संबंधित शासकीय प्रशासन खात्याकडे सादर केला आहे का? किंवा याबाबत सबंधित जबाबदार प्रशासनाने नवनिर्वाचित पुलाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर सदर रस्ता सर्वसामान्य जनतेला सुरक्षित रहदारीच्या योग्य आहे का?, याबाबत परिवेक्षण अहवाल घेतला आहे का? याबाबत जबाबदार शासकीय अधिकारी यांनी योग्य ती चवकशी करण्यात यावी अन्यथा स्वयंम घोषित ठेकेदाराची या बहुमूल्य कामाची दखल ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यासाठीही असाच वशिला लावावा.

ज्या पद्धतीत निकृष्ट दर्जाच्या कामाची कार्यपद्धती जनसामान्याच्या जीविताची खेळ करण्यासाठी सदर पुलावरून रहदारी करताना जीव मुठीत धरून करावी लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी शिगा बाहेर काढून ठेवलेल्या आहेत पुलाच्या बांधकामाच्या येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर जसे मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी अवघड खड्डे आणि दोन्ही बाजूला धोकादायक वस्तुस्थिती निर्माण केली जाते, तशी काहीशी परिस्थिती या वजरवाडी रस्त्यावरील पुलावरून रहदारी करताना सर्वसामान्य जनतेला तसेच तिथून काही अंतरावर असलेल्या भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यापीठात अ पा क (अदन्यानं पालनकर्ता) विद्यार्थी व प्राचार्य वर्ग तसेच आजुबाजूच्या गावातील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे.
याबाबत जबाबदार रेकेदार यांना संबंधित शासकीय प्रशासन अधिकारी यांनी वेळीच योग्यती समाज द्यावी व संबंधित पुलावरून मानवाच्या जीवितास व वाहतूक रहदारीस कोणताही धोका किंवा अडथळा होऊ नये याबाबत योग्य दुरुस्ती त्वरीत करण्यास लेखी सूचना करण्यात यावी आणि या दरम्यान जर कोणत्याही पद्धतीचा अपघात सदर पुलावरून रहदारी करताना सवस्मान्य जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याबाबत आर्थिक मदतिची भरपाई पूर्णपणे जबाबदार ठेकेदारीत असलेल्या जबाबदार व्यक्ती यांच्याकडूनच वसूल करण्यात यावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लिखित निवेदिकेच्या नियमात राहून रस्ते विकास करण्यासाठी पुरेसा निधी शासकीय कोठ्यामधून देण्यात येत असल्याने नियोजित कामाचे निविदा प्रक्रिया तयार करूनच टेंडर काढण्यात येते आणि याबाबत सबंधित जबाबदार ठेकेदार यांनी शासकीय नियमात राहून लेखी नियोजनावरून योग्य व दर्जेदार कामाची कार्यपद्धती जनसामान्याच्या हिताचीच होईल याबाबत वचननामा सादर केलेला असतो मग अस या बाबत आचरण न करणाऱ्यांची नावे रेकॉर्ड मध्ये नोंद का घेऊ नये?, असा सवाल मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनतर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles