वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रिं. एम. आर. देसाई इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. शौर्य शंकर मांजरेकर याने घवघवीत यश संपादन केले असून त्याने ६५.७७ टक्के गुण संपादन करून शहरी सर्वसाधारण गटातून इंग्रजी माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

कु.शौर्यला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मिताली होडावडेकर,शिक्षक अनिकेत वेंगुर्लेकर,संजय परब,हर्षला करंजेकर,सोनल जोशी तसेच त्याची आई उपक्रमशील व आदर्श शिक्षिका सौ.शामल शंकर मांजरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कु. शौर्यचे प्रशालेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे – देसाई, दौलत देसाई, सुरेंद्र चव्हाण आदिनी अभिनंदन केले आहे.
शौर्य आदर्श व उपक्रमशील शिक्षिका शामल मांजरेकर व व्यावसायिक शंकर मांजरेकर यांचा सुपुत्र असून विमा सल्लागार व्यावसायिक तथा पत्रकार संजय पिळणकर यांचा भाचा आहे.


