सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज उबाठा नेते तथा माजी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंत कुटुंबीयांची भेट घेतली व विक्रांत सावंत आणि संपूर्ण सावंत कुटुंबियांचे सांत्वन करत मायेने धीर दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, महिला आघाडीच्या सौ. श्रेया परब, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर महिला आघाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, गुणाजी गावडे, पंकज शिरसाठ, सुनील गावडे, उमेश नाईक, अशोक धुरी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


