सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील रहिवाशी प्रिया चव्हाण यांनी नुकतीच आत्महत्या करत जीवन संपवले. आज त्यांचे वडिल श्री. तावडे यांची कलबिस्त येथील घरी जाऊन शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांसह अन्य उपस्थित होते.



