सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये इन्वेस्टीचर सेरेमनीचे दिमाखात व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने तसेच राजमातांच्या प्रतिमापूजनाने झाले. यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर जयेश खंदरकर उपस्थित होते. तसेच मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, संचालक प्रा. डी. टी. देसाई ,सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम.लविना आल्मेडा यांनी या सेरेमनीचा उद्देश त्याचप्रमाणे स्कूल हाऊसेसची रचना, स्कूल हेड बॉय, हेड गर्ल, प्रीफेक्ट्स तसेच पर्झीवरन्स,ऑनर, पीस व ब्रेव्हरी या हाऊसेसच्या कॅप्टन्सची कर्तव्ये समजावून सांगितली. तद्नंतर शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या ‘ल्युमिनस’ या प्रेरणादायी लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व लीडर्सना बॅचेस देऊन अधिकार प्रदान करण्यात आले. यानंतर लीडर्सना जबाबदारीची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर जयेश खंदरकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील शिस्तीचे महत्व समजावून सांगितले. तसेच विद्यार्थी दशेतील आदर्श वर्तन, देशभक्ती व समाजाप्रती कृतज्ञता बाळगण्याची शिकवण दिली.त्याचप्रमाणे त्यांनी मुलांना मोबाईलचा मर्यादित व सुयोग्य वापर करणे तसेच व्यसनांपासून दूर राहण्याबाबत देखील ओघवत्या शब्दांत मार्गदर्शन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . त्याचप्रमाणे युवराज लखमराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध वर्तनाची आवश्यकता स्पष्ट करून विविध शालेय उपक्रम व क्रिडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.प्रशालेतर्फे प्रमुख पाहुण्यांना सप्रेम भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.लवीना आल्मेडा व श्रीम. इंतजिया फर्नांडिस यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम. फरजाना मुल्ला, श्रीम.लविना आल्मेडा, श्री.गोविंद प्रभू, श्री. भूषण परब यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी देखील सहकार्य केले.


