Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

उमाकांत वारंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी निवड!

सावंतवाडी : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक उमाकांत सदाशिव वारंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट ) सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी ही निवड केली असून पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाच्या विविध ध्येय-धोरणाच्या अंमलबजावणीसाठी श्री. वारंग यांना सूचित केले आहे.

उमाकांत वारंग हे सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक असून सातत्याने सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवित असतात. विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा सातत्याने सहभाग असतो. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles