– मोर्चा साठी कार्यकर्तेच नसल्याने माजी आम. नाईक यांच्यावर निवेदन देण्याची नामुष्की..
– उबाठामधील दोन गट वेंगुर्ले येथे दिसून आले स्पष्ट.
वेंगुर्ले : उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज दाभोली येथील प्रकारणावरून वेंगुर्ले येथे जाहीर केलेल्या आंदोलनाचा फज्जा उडाला. स्थानिक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आम. नाईक यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेंगुर्ले येथून पळ काढावा लागला. त्यांच्या सोबत असणारे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही या आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले. तर दुसऱ्या बाजूला उबाठा सेने तर्फे शहरात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम दणक्यात केला. त्यामुळे उबाठा मधील दोन गट एक पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आले.

दाभोली येथील जमीन विक्री प्रकरणावरून स्थानिक जमीन मालकांबरोबर आपण आहोत असे उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आम. परशुराम उपरकर यांनी जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात येऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी दोघांनी मागणी केली होती. त्यावेळी ही फारसे स्थानिक पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांनी २१ जुलै रोजी रजिस्टर कार्यालय समोर आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान काम उबाठा चे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी आणि मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी वेंगुर्ले येथे येऊन पत्रकार परिषदेतून मतदार संघ बाहेरच्या पदाधिकारी यांनी मनमानी करून या मतदार संघात ढवळा ढवळ करू नये असा इशारा दिला होता. मात्र आम. नाईक यांनी जिल्हाप्रमुख यांच्या त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून आज आंदोलन करणारच अशी गर्जना केली. परंतु आज प्रत्यक्षात आम.नाईक यांच्या सोबत आंदोलनात हातावर मोजण्या एवढेच कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आले होते तेच होते. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र या आंदोलनाकडे फिरकले ही नाही. त्यातच माजी आम नाईक यांच्या बरोबरचे माजी आम. परशुराम उपरकर यांनीही आंदोलनात येण्याचे टाळल्याने आम. वैभव नाईक एकाकी पडले. त्यामुळे त्यांनी जास्त वेळ न घेता अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तेथून काढता पाय घरी कणकवली येथे घरी जाण्याचे पसंत केले.
दरम्यान उबाठा सेने तर्फे वेंगुर्ले येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेला न. प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम सर्वांनी मिळून केला. यावेळी बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत परब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


