सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी वा शिक्षण पूर्ण करता करता हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा बारावी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा शालान्त परीक्षा दहावी किंवा पूर्वीची अकरावी उत्तीर्ण अधिक दोन वर्षांचा कोणताही शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. नियमित शुल्कासह ३१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येईल.

या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे अथवा केंद्र संयोजक राजेश मोंडकर ९४२३३०१७३१, मार्गदर्शक मंगल नाईक-जोशी ९४०५८३१६४६, प्रा. रुपेश पाटील ९४०४७३७८९३ यांच्याशी संपर्क साधावा. अभ्यासक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिर अभ्यासक्रमाचे केंद्रप्रमुख रमेश बोन्द्रे, अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, डॉ. जी. ए. बुवा यांनी केले आहे.


