सावंतवाडी : आज सायंकाळी 5:00 च्या सुमारास माजगाव गरड संजू टायरच्या समोर मोटरसायकल स्लिप होऊन सौरभ मालटकर (वय 23) या युवकाचा अपघात झाला या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाक व कानातून रक्त स्त्राव होत होता. सामाजिक बांधिलकीच्या रूपा गौडर यांनी तेथील नागरिकांच्या मदतीने सदर युवकाला रिक्षामध्ये घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व लगेच रवी जाधव व लक्ष्मण कदम यांना हॉस्पिटलमध्ये बोलून घेतले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले युवक गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी सदर युवकाला तात्काळ गोवा बांबोळी येथे जाण्याचा सल्ला दिला.

108 वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना रवी जाधव यांनी विनंती केली असता त्यांनी 102 रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिली. त्यानंतर 102 ने सदर युवकाला गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले.
सदर अपघात ग्रस्त युवक नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल मालडकर यांचा मुलगा आहे.
मालडकर यांनी डॉक्टर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुपा गौडर (मुद्राळे), रवी जाधव व लक्ष्मण कदम यांचे आभार मानले.


